Saturday, April 27, 2024

/

‘नाल्यालगत पुराचा धोका’ का?

 belgaum

शहरातील मुख्य नाल्याची साफसफाई करण्याच्या दृष्टीने आणि शहरातील नागरिकांना पावसाच्या पाण्याचा धोका पोहोचु नये यासाठी महानगर पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्वी काळजी घ्याची गरज आहे. मात्र त्या कडे दुर्लक्ष करून अनेकांचे जीव धोक्यात घाकण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. त्यामुळे झोपी गेलेल्या प्रशासन अपघात झाल्यानंतर जाग येणार का? हा प्रश्न कायमचा राहणार, असे दिसून येत आहे.
मान्सूनपूर्वी महानगरपालिकेने शहरातील मुख्य बळळारी नाला तसेच इतर नाल्यातील असलेला गाळ आणि अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून अनेकांचे जीव धोक्यात घालून प्रशासन नंतर जागे होणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पावसाळ्यापुर्वी शहरातील मुख्य नाले, उपनाल्यांची स्वच्छता तसेच आपत्ती व्यवस्थापनाची पूर्व तयारी करण्यासाठी मानपाकडून नियोजन करण्याची गरज असते. त्यानुसार पावसाळ्यापूर्व दीड महिन्यांपूर्वी नाल्याची सफाई करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी मनपाच्या अभियंत्यांना नाले कुठे आहेत व त्यांच्या सीमा कोठून सुरू होतात याची माहिती देखील नाही. त्यामुळे कोणता नाला सफाई करावा असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि याला अपवाद म्हणून नगरसेवक आणि महापौर याना देखील काही देणेघेणे नाही, असे दिसून येत आहे.
शहरातील मुख्य नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. बल्लारी नाल्यावरही अतिक्रमण करण्यात आले होते. मात्र याला जोरदार विरोध झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण हटवूले आहे. मात्र ज्या ठिकाणच्या तक्रारी झाल्या नाहीत त्या ठिकाणी पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Samarth nagar
मागील सहा दिवसा पासून पावसाने चांगलीच दमछाक उडवली आहे. त्यामुळे हा पाऊस कायम राहिला असता तर मात्र नाला परिसरातही पुराचा धोका निर्माण झाला असता. मात्र पावसाने दिन दिवसापासून पाऊस कमी झाल्याने हा धोका तात्पुरता कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही नाल्याचे सर्व्हेक्षण करून ताबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र मनपाच्या मनमानी कारभार यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येईल अशी माहिती दिली जात आहे. तसे पाहता मनपाने वेळीच धोकादायक वळण ओळख करून त्यांना जाहीर नोटीस बजावण्याची गरज असते. मात्र मानपलाच याची माहिती नसल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे यापुढे पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनेतुन बचाव करण्यासाठी पहिलाच उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.