Friday, April 26, 2024

/

कर्नाटकात ज्येष्ठ संघ कार्यकर्त्याचे भाजपविरोधात बंड, शिवसेनेला पाठिंबा

 belgaum

कर्नाटकातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते एन.एच गौडा यांनी संघ आणि भाजपविरोधात बंड पुकारले असून शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. गौडा हे गेली तीन दशके संघात सक्रीय आहेत. आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचारामध्ये रुतलेल्या संघाने आपली विश्वासर्हता गमावली आहे, असा आरोप गौडा यांनी केला. संघासारख्या खोट्या हिंदुत्ववादी संघटनेसाठी काम न करता शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कर्नाटक विधानसभा निवडणूक काही तासांवर आली असताना गौडा यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.Rss

अनेक संघ कार्यकर्ते संघाच्या मुलभूत शिकवणीपासून दूर गेले आहेत, असा दावा गौडा यांनी या पत्रकार परिषदेत केला. संघातून भाजपमध्ये दाखल झालेली मंडळी ही आता भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या विळख्यात अडकली आहेत. एकेकाळी भाजप जे आरोप काँग्रेसवर करत तेच आरोप संघ कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांना लागू होतात’ असा दावा त्यांनी केला.

भाजप काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत असे पण आता बी.ए. येडियुरप्पांचा मुलगा, मुर्गेश निरानींचा भाऊ, जगदीश शेट्टर यांचा भाऊ अशी अनेक भाजप नेत्यांचे नातेवाईक राजकारणात सक्रीय आहेत, असे त्यांनी सांगितले.

 belgaum

‘त्यांनी सर्व पैसा पचवला’

बी.एस. येडियुप्पा, जगदीश शेट्टर, शोभा करंदगजे आणि अनंत कुमार या कर्नाटक भाजपमधील प्रमुख नेत्यांवर गौडा यांनी यावेळी जोरदार हल्ला केला. ही सर्व नेते पैसा पचवून आता गबर झाली आहेत. काही दशकांपूर्वी सामान्य परिस्थिती असलेली ही मंडळी इतकी श्रीमंत कशी झाली? असा प्रश्न त्यांनी विचारला.

‘संघ आणि भाजपचे नेते जमिनी हडप करण्यातही सहभागी आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर आपणास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली’ असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

साभार #saamnaaonline

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.