Friday, April 26, 2024

/

रेल्वे उड्डाण पुलाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील

 belgaum

रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यास जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी हिरवा कंदील दाखवला असून ठेकेदार कोणत्याही क्षणी काम सुरु करू शकतात . रहदारीला अडथळा होत असल्याने ओल्ड पी बी रोड चे ब्रिजच काम पूर्ण झाल्या शिवाय रेल्वे पुलाच काम सुरु करू नये अशी स्थानिकांनी अनेकदा मागणी केली होती .

rob-work
रविवार पासूनच जे सी बी च्या साहायाने ब्रिजच्या बाजूला चर मारून माती उपसा करण्यात येत आहे मात्र दोन्ही बाजूनी बॅरिकेट्स लावून हा रोड रहदारीसाठी खुला ठेवण्यात आला आहे . जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी ट्रॅफिक रिपोर्ट पोलिसांचा अहवाल पाहून काम सुरु करण्यास अनुमती दिल्याने कोणत्याही क्षणी बॅरिकेट्स लावून काम बंद केलं जाऊ शकत .
रेल्वे उड्डाण पूल बॅरिकेट्स लावून रहदारीसाठी बंद केल्या नंतर ट्रॅफिक काँग्रेस रोड मधून डायव्हर्ट केली जाऊ शकते . बेळगाव live ला मिळालेल्या महिना नुसार आगामी दोन दिवसात किंवा दिवाळी संपवून पुन्हा बॅरिकेट्स लावून रोड रहदारीसाठी बंद केला जाऊ शकतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.