Friday, December 5, 2025

/

डॉ. किवडसन्नावर : विश्वविजेत्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे प्रेरणा स्तोत्र

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पहिल्यांदाच आयोजित केलेल्या अंध महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावून भारतीय महिलांनी इतिहास रचला. या प्रेरणादायी विजयाचे प्रेरणा स्तोत्र बेळगावातील बैलहोंगल येथील नेगिनहाळ गावचे पुत्र डॉ. महांतेश जी. किवडसन्नावर हे आहेत हे विशेष होय.

कोलंबो श्रीलंका येथे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या अंध महिल्यांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने प्रतिस्पर्धी नेपाळ संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करण्याद्वारे विजेतेपद पटकावले.

सदर अंतिम सामन्याला डॉ. महांतेश जी. किवडसन्नावर हे देखील उपस्थित होते. स्टँडवरून सामना पाहिल्यानंतर ते म्हणाले, जगज्जेते पद मिळवताच मुलींनी आनंदाचे अश्रू ढाळले आणि मलाही गहिवरून आले.

 belgaum

” हा विजय एक मजबूत संदेश देतो कि, “जेंव्हा मुलींना संधी दिली जाते, तेंव्हा त्या जग जिंकू शकतात.” अंध असलेले डॉ. महांतेश आव्हानांना ध्येयात रूपांतरित करतात. समर्थनम ट्रस्टचे (1997) सह- संस्थापक असलेल्या डॉ. महांतेश जी. किवडसन्नावर यांनी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाची (सीएबीआय) स्थापना केली आहे.

आपल्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना सक्षम बनवले आहे. त्याचप्रमाणे अंधांच्या क्रिकेटमध्ये संजीवनी फुकून ते भरभराटीला आणले आहे. डॉ. किवडसन्नावर यांनी आजच्या घडीला 700 हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे प्रोत्साहन आणि नेतृत्वाखाली भारताच्या अंध संघांनी उपरोक्त महिला क्रिकेटच्या ऐतिहासिक विश्वविजेते पदासह अनेक जागतिक विजेतेपदे जिंकली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.