बेळगाव :बेळगाव तालुक्यातील येळळूर गावचे जवान राहुल आनंद गोरल रा. संभाजी गल्ली येळळूर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. उत्तर प्रदेशातील बरेली येथे ते भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होते त्यांच्यावर आर्मी इस्पितळात उपचार सुरू होते 2012 साली ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.
संभाजी गल्ली येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जावन राहूल आनंद गोरल वय 33 यांचा लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले गेले काही महिन्यांपासून ते आजारी होते. सैन्य दलाच्या कार्यालयातून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निरोपानुसार त्यांचा अंत्यविधीगुरुवार रोजी सायंकाळी 5 वा. येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे.
राहुल हे तेरा वर्षांपासून सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत. त्यांना लेखनाचा छंद होता.त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ते काही महिन्यांपासून आजारी असल्यामुळे त्यांची आई अनिता गोरल या त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सोबत होत्या. राहुल यांच्या प्रश्नात आई , एक विवाहित बहीण,भावोजी, असा परिवार आहे.



