हनुमान नगर वासियांनी घेतला ब्लॅकआउटचा अनुभव

0
6
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव मधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हनुमान नगर, कुवेंपू नगर आणि टीव्ही सेंटर परिसरात आज रात्री आठ ते सव्वा आठ पर्यंत ब्लॅक आऊट करण्यात आले होते. तत्पूर्वी गाडीवरून सूचना देण्यात आल्या होत्या. घरामध्ये इन्व्हर्टर असलेल्यांना सुद्धा ते लावू नये यासाठी सूचना देण्यात आली होती .

या ब्लॅकआउट बाबत लोकांच्यात उत्सुकता निर्माण झाली होती. बरेच आबालवृद्ध रस्त्यावर तसेच गच्चीमध्ये जाऊन या अंधाऱ्या रात्रीचा अनुभव घेत होते.ज्यांच्या घरामध्ये इन्वर्टर आहे त्यांना सुद्धा इन्व्हर्टर बंद करावे म्हणून अगोदर सूचना देण्यात आली होती तसेच सतत 15 मिनिटे सायरन वाजत होता. रस्त्यावरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती .बऱ्याच लोकांनी आपले मोबाईल टॉर्च बंद करून ठेवले होते एकंदर सर्वत्र औत्सुक्या चे वातावरण होते

यामागील उद्देश नागरिकांना नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळातील वीजविहीन परिस्थितीचा थेट अनुभव देण्याचा होता.
या उपक्रमासाठी पूर्वसूचना देण्यात आली होती, तरीही अनेक नागरिकांना त्याची अचूक कल्पना नसल्यामुळे काहीसा गोंधळ व औचकपणा अनुभवावा लागला. घराघरांमध्ये विजेचे उपकरणे बंद करण्यात आले होते. विशेष म्हणजे मोबाईलचा टॉर्च वापरणेही बंदी घालण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर काळोखात बुडाला होता.

 belgaum

स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार नागरिकांनी उत्तम सहकार्य केले. अंधारात चालताना, संवाद साधताना आणि घरात कार्य करताना त्यांनी संयम आणि शांतता राखली. काही वयोवृद्ध नागरिक व लहान मुलांना सुरुवातीस त्रास जाणवला, मात्र कुटुंबातील इतर सदस्यांनी काळजीपूर्वक त्यांची साथ दिली.

“अशा उपक्रमामुळे आपत्तीच्या काळात आपण कसे वागावे, काय तयारी असावी याची जाणीव होते,” असे एका रहिवाशाने सांगितले.
दुसऱ्या एका नागरिकाने सांगितले की, “अचानक अंधार पडल्यानंतर समजले की ही पूर्वनियोजित योजना आहे. पहिल्यांदा थोडी भीती वाटली, पण नंतर काही वाटले नाही.

मॉक ड्रिल काळात बेळगाव महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणेने या भागात भेट दिली मॉक ड्रिल संपल्यानंतर महापालिका आयुक्त बी शुभा यांनी माध्यमांशी बोलताना आपत्कलीन काळाला सामोरे कसे जावे यासाठी लोकांना सवय व्हावी म्हणून यशस्वीरित्या मॉक ड्रिल घेण्यात आले. सध्या युद्ध जन्य परिस्थिती नाहीये तरी देखील जनहितार्थ या भागात ब्लॅकआऊट करण्यात आला होता इस्कॉन पोलीस आणि महापालिका विविध खात्याच्या सहयोगाने जनतेने दिलेल्या सहकार्यामुळे हा ब्लॅकआड यशस्वी झाल्याची त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.