खडेबाजार पोलिसांच्या कारवाईत दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपींना अटक

0
4
Khade bazar police station
Khade bazar police station
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी प्रकरण उघडकीस आले असून, आरोपीकडून १.४५ लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीकडून अन्य प्रकरणांवरही तपास सुरू आहे.

खडेबाजार पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 07/2025 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 303 (2) नुसार प्रकरण दाखल करण्यात आले होते. तपासादरम्यान, २८ जानेवारी २०२५ रोजी आरोपी रमेश चंद्रकांत अरळिकट्टी (वय ३३, रा: सुभाष गल्ली, ओल्ड गांधी नगर, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपीने नाथपै सर्कल, बेळगाव येथे एका दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून होंडा कंपनीच्या दोन अ‍ॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत १,४५,००० रुपये आहे. तसेच खडेबाजार पोलीस ठाणे व शहापूर पोलीस ठाण्यातील दोन दुचाकी चोरी प्रकरणांचा छडा देखील लागला आहे.

 belgaum

उपपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश, उपपोलीस आयुक्त (गुन्हे व सुरक्षा) निरंजनराज अर्स, आणि एसीपी खडेबाजार विभाग शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय आर. बी. सौदागर, पीएसआय आनंद आदगोंड, व कर्मचारी ए. बी. शेट्टी, बी. एस. रुद्रापूर, बी. एल. सर्वी, बी. ए. करगर, एस. के. चव्हाण, ए. एस. हेग्गण्णा, बेळगाव शहर तांत्रिक विभागाचे रमेश अक्की आणि एम. एस. काशीद यांनी कारवाईत सहभाग घेतला.

पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी या कामगिरीचे विशेष कौतुक केले असून तपास कार्य अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.