भाजपच्या महापौरानी राजकीय शिष्टाचार पाळला नाही का?

0
5
City corporation
 belgaum

बेळगाव लाईव्ह :रस्ता रुंदीकरणात 20 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार असल्यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे. पण कशातच राजकीय शह काटशह रंगत असल्यामुळे बेळगाव महापालिके समोर नवे संकट उभे टाकण्याची भीती व्यक्त होत आहे.

रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया राबविण्यासाठी 12 सप्टेंबर च्या आधी प्रांताधिकाऱ्यांच्या खात्यात वीस कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. या निधीसाठी महापालिकेने या आधीच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. पण सरकारने हा प्रस्ताव धुडकावत हा विषय महापालिकेनेच आपल्या परीने हाताळावा अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेसमोर आर्थिक संकट पुन्हा गडद होत चाललेले आहे.

एकीकडे आर्थिक संकट उभे टाकले असताना महापालिकेत मात्र पक्षीय राजकारण जोरात सुरू आहे. आपल्याकडे निधी नसल्यामुळे राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी आता महापालिकेतून होत आहे. पण ज्यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावला आले त्यावेळी मात्र महापौर उपमहापौर त्यांच्या स्वागताला जात नाहीत. शिष्टाचार गुंडाळून ठेवतात. असा आरोप काही लोकांतून होत आहे. त्यामुळे राज्य सरकार कशाच्या आधारावर महापालिकेला मदत करणार असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

 belgaum

महापालिकेकडे सध्या 39 कोटी रुपये आहेत. या निधीतून वीस कोटी रुपयांची भरपाई, विकास कामे, कर्मचाऱ्यांचे वेतन या साऱ्या बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यामुळे हा निधी पुरणार नसून महापालिकेला मदत पुन्हा राज्य सरकारकडूनच घ्यावी लागणार आहे.
महिनाभरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावला दोन वेळा आले. ज्यावेळी मुख्यमंत्री बेळगावला येतात त्यावेळी प्रथम नागरिक म्हणून महापौरांनी त्यांचे स्वागत करणे हा शिष्टाचार आहे. पण या शिष्टाचाराला बगल देऊन महापौर सविता कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली आहे. त्याचा कळत नकळत परिणाम महापालिकेच्या सर्व कारभारावर होत असल्याचे दिसून येत आहे.City corporation

पक्ष राजकारण सोडून महापौराने मुख्यमंत्र्याचे स्वागत करणे अपेक्षित होते. पण तसे न झाल्यामुळे आता पक्षीय राजकारण जोर धरू लागले आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावला येऊन सुद्धा महापौर आणि इतर अधिकारी त्यांना भेटत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता हाच विषय धरून पुढे राजकारण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे महापौर उपमहापौर राजकीय शिष्टाचार पाळत नाहीत का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.