मराठा लाइट इन्फंट्रीतर्फे कारगिल युद्ध विजयाचा वर्धापन दिन साजरा

0
2
Mlirc
 belgaum

बेळगाव  लाईव्ह :मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावतर्फे कारगिल युद्धातील भारताच्या विजयाचा 25 वा वर्धापन दिन आज शुक्रवारी सकाळी दिमाखात साजरा करण्यात आला.

शर्कत युद्ध स्मारकाच्या ठिकाणी झालेल्या या समारंभात कारगिल संघर्षादरम्यान प्राणांची आहुती देणाऱ्या शूर युद्धवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कारगिलच्या आव्हानात्मक भूभागात शौर्याने लढणाऱ्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी शर्कत युद्ध स्मारक येथे लष्करी अधिकारी आणि जवानांच्या उपस्थितीत समारंभाची सुरुवात झाली.

 belgaum

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी याप्रसंगी राष्ट्राच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी शहीद झालेल्या जवानांच्या धैर्य आणि समर्पणाबद्दल स्मरण व कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले. कारगिल विजय दिवसाचे स्मरण म्हणून 26 जुलै या दिवसाला खूप महत्त्व आहे.

ही तारीख 1999 मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी घुसखोरांनी घुसखोरी केलेली मोक्याची शिखरे पुन्हा ताब्यात घेतली, त्या ऑपरेशन विजयच्या यशाचे प्रतीक आहे. या विजयाने केवळ भारताच्या लष्करी पराक्रमाचेच प्रदर्शन घडले. एवढेच नव्हे तर आपल्या सैनिकांचा अविचल दृढनिश्चय आणि बलिदानही अधोरेखित केले.

शर्कत युद्ध स्मारक येथे बोलताना ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी आजच्या दिवशी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचे महत्त्व पटवून दिले. शर्कत युद्ध स्मारक सारखी स्मारके देशाच्या सीमांचे रक्षण करताना भारतीय सैन्याने दाखवलेल्या अदम्य मनोबल आणि शौर्याचे स्मरण करून देण्याचे काम करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.Mlirc

भारतीय सैन्य देशाच्या संरक्षणासाठी शौर्याचा आणि वचनबद्धतेचा वारसा जपत आहे. शूर ह्रदयांचा सन्मान करण्यासाठी मराठा सेंटर येथील आजच्या सारखे समारंभ वर्तमान आणि भावी पिढ्यांना सेवा आणि त्यागाचे सर्वोच्च आदर्श कायम ठेवण्यासाठी प्रेरित करतात.

माजी सैनिक संघटनेच्यावतीने कारगिल विजयोत्सव

बेळगाव लाईव्ह : माजी सैनिक संघटनेच्या वतीने आज कुमार गंधर्व सभागृहात कारगिल विजय दिवसाचे स्मरण करून भारताच्या स्वाभिमानासाठी आणि सार्वभौमत्वासाठी लढणाऱ्या निर्भीड योद्ध्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दोन मिनिटे स्तब्धता पाळून आणि हुतात्म्यांना अभिवादन करून झाली. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमातेला अभिवादन करण्यात आले. सुरेश हांजी यांनी स्वागत केले. व्यासपीठावर डॉ. सोनाली सरनोबत, सौ. मंगला मेटगुड, जगदीश पुजेर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरली नागराज, विनयकुमार बालिकाई, मंगला मठद, सफला नगररत्न आणि वीणा विजापूर आदींची उपस्थिती होती.

या सोहळ्यात कारगिल युद्धातील वीरांचे शौर्य, बलिदान आणि अतूट समर्पण यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेरणादायी भाषणे झाली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.