belgaum

रविवार पेठ होलसेल बाजारपेठ खुली झाल्याने वाहनांची मोठी रांग

0
1201
Vehicle rush
Vehicle rush ravivar Peth
 belgaum

लॉक डाऊनमुळे मध्यंतरी बंद ठेवण्यात आलेल्या रविवार पेठ होलसेल बाजारपेठेतील व्यवहार सुरू झाले असून त्यामुळे या भागात मालगाड्यांची मोठी रांग लागल्याचे चित्र गुरुवारी सायंकाळी पहावयास मिळाले.

कोरोना प्रादुर्भावासह लॉक डाऊनमुळे बंद पडलेल्या रविवार पेठ होलसेल बाजारपेठेमधील व्यवहार गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून पुनश्च सुरू झाले आहेत. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली रविवार पेठ होलसेल बाजारपेठे ही जिल्ह्यातील सर्वात मोठी होलसेल बाजारपेठ आहे. लॉक डाऊनमुळे मध्यंतरी बंद ठेवण्यात आलेली ही बाजारपेठ जिल्हा प्रशासनाच्या अनुमतीने गुरुवारी सायंकाळपासून पुनश्च सुरू झाल्यामुळे या बाजारपेठेत माल घेऊन येणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली होती.

Vehicle rush
Vehicle rush ravivar
Peth

रविवार पेठेतून कर्नाटक चौक, पाटील गल्लीमार्गे थेट शनि मंदिरापर्यंत लागलेली वाहनांची ही लांबलचक रांग सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे एरवी धाकदपटशा करणारे रहदारी पोलीस शिस्तबद्धरित्या वाहनांची रांग लावून मालवाहू वाहनचालकांना मार्गदर्शन करताना दिसत होते.

 belgaum

शहरातील रविवार पेठ होलसेल बाजारपेठ आज गुरुवार पासून दररोज सायंकाळी 6 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. या कालावधीपैकी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंतचा वेळ व्यापारासाठी देण्यात आला असून त्यानंतर रात्री 11 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आलेल्या मालवाहू गाड्या अनलोड करून त्यांना बाजारपेठे बाहेर पाठवायचे आहे. दरम्यान, कडधान्य, किराणामाल, तेल आदी कोणता माल कोणत्या दिवशी मागवायचा? याबाबत बुधवारी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.