बेळगाव तालुका येतोय पूर्वपदावर

0
409
Flood markadey drone image
 belgaum

मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. यापूर्वी पूरपरिस्थितीमुळे अनेकांना बेघर होण्याची आणि निवारा शोधण्याची वेळ त आली आहे. मात्र बेळगाव तालुक्यात ही परिस्थिती सुधारत आहे. ही परिस्थिती निवारण्यासाठी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लीकर्जून कलादगी यांनी केलेले प्रयत्न फळाला आल्याचे दिसून येत आहे.

तालुका पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या आहेत. सध्या बेळगाव तालुक्यातील पूर परिस्थिती कमी झाली असली तरी अजूनही काही गावांना याचा फटका बसला आहे. विशेष करून या भागातील समस्या जाणून घेण्यासाठी मल्लिकार्जुन कलादगी यांनी चांगले प्रयत्न केले आहेत.

Flood markadey drone image

 belgaum

(Photo: flood belgaum taluka markandey river image file 8 aug. 2019)

बेळगाव तालुका सध्या पूर परिस्थितीतून बाहेर पडत आहे. विशेष करून मार्कंडेय नदी पात्रा बाहेरील शेत जमीनीचा धोका टाळला आहे यामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे आवाहन य केले होते. आणखी दोन-तीन दिवस अहवाल स्वीकारण्याचे प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाईची माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

कलादगी यांनी पूरग्रस्त परिस्थितीची जाणीव ठेवून सुट्टीच्या दिवशीही तालुका पंचायत कार्यालय सुरू ठेवले होते. त्यांच्या कार्याबद्ल कौतूक आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही ज्यांची घरे पडली आहेत, ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने तालुका पंचायत कार्यालय किंवा तलाठी अथवा ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकार्‍यांची संपर्क साधून आपला अहवाल सादर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.