बेळगाव लाईव्ह : जय किसान होलसेल भाजी मार्केट प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश देत दाखल करण्यात आलेल्या रिट अपीलावर नोटीस बजावली आहे. ही रिट अपील सिद्धगौडा मोदगी यांनी एकल न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देत दाखल केली आहे.
या प्रकरणाची सुनावणी करताना विभागीय खंडपीठाने कर्नाटक अपिलीय न्यायाधिकरण (KAT) समोरील कार्यवाहीस मर्यादा कायदा (Limitation Act) लागू होतो का, या महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्याचा सविस्तर विचार करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले.
तसेच, रिट अपीलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत KAT समोरील कोणतीही कार्यवाही ही त्या निकालाच्या अधीन राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, त्या दिवशी या प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींवर निर्णयाची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
ही नोटीस जय किसान होलसेल भाजी मार्केट वादातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी महत्त्वाची मानली जात असून, संबंधित पक्षांचे लक्ष आता १३ ऑगस्टच्या सुनावणीकडे लागले आहे.





