belgaum

समाजसेवक, पोलिसांची माणुसकी : बेवारस वृद्धेवर केले अंत्यसंस्कार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराचा फायदा न होता वृद्धापकाळाने निधन पावलेल्या एका बेवारस वृद्ध महिलेवर पोलीस विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समन्वयाने अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवल्याची घटना आज घडली.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, संबंधित वृद्ध महिलेचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ओळख पटण्याची किंवा कोणी नातेवाईक पुढे येण्याची वाट पाहत बेवारस पडून होता. मृतदेहावर कोणीही हक्क सांगायला न आल्याने, दिवंगत आत्म्याला सन्मानपूर्वक अंतिम संस्कार मिळावेत यासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात आले.

माजी महापौर विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एपीएमसी पोलीस स्टेशनचे सीपीआय उस्मान आवटी यांच्या सहकार्याने ॲलन विजय मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज रविवारी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधून सदाशिवनगर स्मशानभूमीत हलवला.

 belgaum

तेथे मयत वृद्धेवर सन्मानपूर्वक अंतिम संस्कार पार पाडण्यात आले. याप्रसंगी ॲलन मोरे, एपीएमसी पोलीस कर्मचारी एम. यडहळ्ळी, अवधूत तुडवेकर, अद्वैत चव्हाण पाटील, मायकल पिंटो व इतर उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्या कार्यासाठी शववाहिका पथकाचे सदस्य निशार शमशेर, संजय मेत्री, सदाशिवनगर स्मशानभूमीचे कर्मचारी आणि इतर हितचिंतकांचे सहकार्य लाभले.

उपरोक्त उदात्त कार्याद्वारे माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सीमापलीकडे जाऊन मानवतेची सेवा करण्याची आपली अढळ वचनबद्धता पुन्हा एकदा दर्शवली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.