belgaum

१४ एप्रिल रोजी शहर आणि तालुक्यात ‘ड्राय डे’

0
440
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बेळगाव शहर आणि संपूर्ण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १४ एप्रिल रोजी मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त बोरोसे भूषण गुलाबराव यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.

आंबेडकर जयंतीचा उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वाजेपासून ते रात्री १२:०० पर्यंत सर्व मद्यविक्रीची दुकाने, बार, रेस्टॉरंट्स, क्लब आणि मद्य साठा डेपो बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस उपआयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाची दखल घेत प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीमध्ये मद्य विक्री आणि वाहतुकीवर पूर्ण बंदी असेल. सर्व अबकारी दुकाने बंद करून त्यांना सील लावण्याचे आदेश अबकारी निरीक्षकांना देण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता भंग होऊ नये, यासाठी अबकारी उपआयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 belgaum

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि कर्नाटक अबकारी कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दल सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.