belgaum

होळी निमित्त शहर व्याप्तीत दारू विक्रीवर बंदी

0
859
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह :होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उद्या सोमवारी दि. 2 मार्च रोजी दुपारी 2 वाजल्यापासून मंगळवार दि. 3 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीमध्ये मद्य अर्थात दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी व पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी हा आदेश जारी केला आहे. सदर आदेशानुसार उद्या सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून मंगळवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत शहरातील दारू दुकाने, वाईन शॉप, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये दारू विक्री आणि मद्यपानावर बंदी असणार आहे.

सदर बंदी आदेशाचे काटेकोर पालन केले जावे. तसे न केल्यास आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर अबकारी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी जारी केलेल्या आदेशामध्ये नमूद आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.