belgaum

असहाय्य अवस्थेतील वृद्धाला शेतकऱ्यांनी दिला मदतीचा हात

0
549
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मानसिक स्थिती बिघडण्यासह पायाला दुखापत झाल्याने रस्त्याकडेला शेतात अन्न पाण्याविना असहाय्य अवस्थेत बसलेल्या एका वृद्धाला शेतकऱ्यांनी मदतीचा हात देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज सकाळी येळ्ळूर रोड, बेळगाव येथे घडली.

सदर 65 ते 70 वर्षीय वृद्धाचे नाव प्रकाश खांडेकर असे असून तो सराफ गल्ली, वडगाव येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा इसम येळ्ळूर रोडवरील एका शेतातील झाडाखाली कालपासून बसून असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

त्यामुळे आज सकाळी शेतकरी नेते राजू मरवे व अन्य शेतकऱ्यांनी प्रकाश खांडेकर यांच्याकडे जाऊन त्याची विचारपूस करण्याबरोबरच उपाशी असलेल्या प्रकाश याच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. तसेच तेथून गस्तीवर जात असलेल्या वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वाहनाला थांबवून शेतकऱ्यांनी घडल्या घटनेची त्यांना माहिती दिली.

 belgaum

दरम्यान 108 रुग्णवाहिका बोलावून घेण्यात आल्यानंतर शेतकरी व पोलिसांनी पायाला दुखापत झालेल्या प्रकाश खांडेकर याला आधार देत रुग्णवाहिकेत घातले आणि उपचारासाठी त्याची रवानगी सिव्हिल हॉस्पिटलकडे केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.