belgaum

नगर पायाभूत सुविधा महामंडळाच्या एमडींची व्हॅक्सिन डेपोला भेट

0
334
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक नगर पायाभूत सुविधा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका पोविता यांनी नुकतीच व्हॅक्सिन डेपो, टिळकवाडी येथील बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी करून आढावा घेतला. तसेच प्रलंबित कामे 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.

व्हॅक्सिन डेपो येथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रुरल लाइफ हेरिटेज पार्क व इतर विकासकामे कांही कारणास्तव प्रलंबित राहिली होती. जी न्यायालयाच्या परवानगीने आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. स्मार्ट सिटीच्या या कामांची पाहणी करण्याची जबाबदारी समन्वय संस्था असणाऱ्या कर्नाटक नगर पायाभूत सुविधा विकास महामंडळावर आहे.

त्या अनुषंगाने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका पोविता यांनी काल मंगळवारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका (एमडी) कविता वारंगल यांच्या समवेत व्हॅक्सिन डेपोला भेट देऊन विकास कामांची माहिती घेतली.

 belgaum

यावेळी व्हॅक्सिन डेपो येथील ग्रामीण जीवन अर्थात रुरल लाइफ हेरिटेज पार्कचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून आर्ट गॅलरीचे काम 80 टक्के, तर एव्हिएशन गॅलरी प्रकल्प 60 टक्के पूर्ण झाल्याची माहिती बेळगावच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता वारंगल यांनी दिली. कहानी दौऱ्याअंती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका पोविता यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक अन्य सूचना करून सर्व कामे येत्या 31 मार्चपूर्वी पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

त्यावेळी स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकाऱ्यांनी प्रलंबित तीन कामांपैकी दोन कामे दिलेल्या वेळेत पूर्ण केली जातील, असे सांगितले. मात्र उर्वरित एका कामासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी केली. याप्रसंगी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसह व्हॅक्सिन डेपोतील विकास कामांशी संबंधित अभियंते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.