belgaum

दुचाकी अपघातात रामनगरच्या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
641
Road accident logo
Road accident logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह: रामनगर येथील एका २७ वर्षीय तरुणाचा मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागरगाळी क्रॉसजवळ घडली. दिगंबर पांडुरंग गावडे (वय २७, रा. रामनगर, ता. जोयडा, जि. उत्तर कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३.३० ते दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला असावा. दिगंबर गावडे हे केए-६५/के-१८९६ क्रमांकाची मोटारसायकल घेऊन रामनगर-आळनावर मार्गावर रामनगरकडून आळनावरकडे जात होते. नागरगाळी गावाच्या हद्दीतील नागरगाळी क्रॉसजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले.

अतिवेगामुळे मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबावर आदळली. धडकेनंतर ते रस्त्याच्या बाजूच्या खोलगट भागात पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.