belgaum

बेळगावात उद्या ‘कन्नड राज्योत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

0
556
dc roshan
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये २४ फेब्रुवारी रोजी कन्नड राज्योत्सव साजरा केला जाणार असून त्यानिमित्त सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुलात प्रसिद्ध गायक विजय प्रकाश आणि अनुराधा भट यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी या सोहळ्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. यापैकी ३ लाख रुपये प्रदर्शनासाठी तर ४७ लाख रुपये मुख्य कार्यक्रमावर खर्च केले जातील. यामध्ये लोकांच्या भोजनासाठी ८ लाख रुपयांची तरतूद असून उर्वरित ३९ लाख रुपयांतून सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. या संपूर्ण सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांकडे देण्यात आली आहे, असे मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या नियोजनावरून कन्नड संघटनांमध्ये काही शंका असल्यास पुन्हा बैठक घेऊन तो प्रश्न सोडवला जाईल. पालकमंत्र्यांशीही यावर चर्चा झाली असून सर्वांना विश्वासात घेऊन कार्यक्रम पार पाडला जाईल, अशी ग्वाही मोहम्मद रोशन यांनी दिली.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, एच.के. पाटील आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.