belgaum

माणुसकीचा स्पर्श: पोलीस आयुक्तांची तत्परता

0
526
 belgaum

बेळगाव लाईव्ह : धोकादायक स्पीड ब्रेकर मुळे झालेला महिलेचा मृत्यू आणि माध्यमातून होत असलेली पोलीस प्रशासनावरील टीका याची दखल घेत बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पीड ब्रेकर चे मार्किंग चे काम सुरू करून कार्य तत्परता दाखवलीच मात्र हे काम सुरू असताना रस्ते किरकोळ जखमी झालेल्या युवकाला फर्स्ट एड देत माणुसकीचे नाते देखील जपले आहे.

काँग्रेस रोडवर स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे ओढण्याचे काम सुरू असताना अचानक ट्रॅफिक जाम निर्माण झाला आणि त्याच दरम्यान एक किरकोळ अपघात घडला. एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक जखमी झाला. त्या ठिकाणी हजर असलेले  शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना त्वरित मदतीचे आदेश दिले.


पोलीस व्हॅनमधील फर्स्ट एड मेडिकल बॉक्स आणण्यात आला आणि जखमी युवकावर त्वरित प्रथमोपचार करण्यात आले. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून उपचाराची खात्री केली. त्यानंतर युवकाला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले.


काँग्रेस रोडवरील स्पीड ब्रेकरचे मार्किंग हे अपघात टाळण्यासाठीच सुरू असलेले काम होते; मात्र कामादरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने हा किरकोळ अपघात घडला. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.


या प्रसंगी पोलीस आयुक्त आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रशासन फक्त कायदा-सुव्यवस्था राखत नाही, तर गरज पडल्यास नागरिकांच्या मदतीला धावून जाते, याचे प्रत्यंतर या घटनेतून आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.