belgaum

बेळगाव पोलिसांचा ‘नंबर प्लेट’ नसणाऱ्या वाहनांना दणका

0
319
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील वाहतूक शिस्त बिघडवणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध बेळगाव पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

शुक्रवारी शहर परिसरात नंबर प्लेट नसलेल्या आणि चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १२६ दुचाकी वाहनधारकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ६३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली. अनेक तरुण आणि वाहनधारक फॅन्सी नंबर प्लेट किंवा नंबर प्लेटशिवाय फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ अन्वये या कारवाया करण्यात आल्या असून, पोलिसांनी केवळ दंड आकारून थांबले नाही, तर अनेक वाहनांच्या नंबर प्लेट जागीच दुरुस्त करून घेतल्या आहेत.

बेळगाव शहर वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनावर स्पष्ट आणि नियमानुसार नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे. यापुढेही अशा प्रकारे अचानक तपासणी मोहीम राबवली जाईल.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि आपल्या वाहनांना अधिकृत बनावटीचीच नंबर प्लेट लावावी, असे आवाहन पोलीस आयुक्त, बेळगाव शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.