belgaum

व्हॅक्सिन डेपोत हेरॉईनची विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात

0
659
Tilakwadi police station
 belgaum

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपो परिसरात सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक करून बेळगांव सीसीबी पोलिसांनी त्याच्याजवळून 21,800 रुपये किमतीच्या हेरॉईन पावडरसह एकूण 26,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव जावेद इलियास बेंडीगेरी (वय 29, रा. बाबली गल्ली, अनगोळ बेळगाव) असे आहे. सीसीबी बेळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरातील रंगमंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी हेरॉईनची विक्री करणाऱ्या जावेद याला छापा टाकून ताब्यात घेतले.

तसेच त्याच्या जवळून 10 ग्रॅम इतक्या प्रमाणात हेरॉईन भरलेल्या 21,800 रुपये किमतीच्या 109 पुड्या, 5000 रुपये किमतीचा एक मोबाईल आणि 170 रुपये रोख जप्त केले.

 belgaum

याप्रकरणी जावेद याच्यासह मुंबईच्या सायन कोळीवाडा येथील एका महिलेविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.