बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील फुलबाग गल्ली येथे सुरू असलेल्या एका जुगारी अड्ड्यावर धाड टाकून मार्केट पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील रोख 9,600 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे दिनेश विजय माळवेकर (वय 35, रा. फुलबाग गल्ली बेळगाव), राहुल प्रदीप जाधव (वय 33, रा. फुलबाग गल्ली बेळगाव), दानिश समीउल्ला दलायत (वय 19, रा. फोर्ट रोड ए. के. देशपांडे गल्ली बेळगाव),
पवन रामू जलगार (वय 19, रा. मारुती गल्ली खासबाग बेळगाव), नितीन बाळू सोमनाचे (वय 30, रा. समर्थनगर दुसरा क्रॉस बेळगाव), लक्ष्मण भीमा हिरेकोप्प (वय 28, रा. समर्थनगर चौथा क्रॉस बेळगाव) आणि मंजुनाथ मलगौड गिडगेरी (वय 24, रा. महाद्वार रोड पाचवा क्रॉस बेळगाव) अशी आहेत.
हे सर्वजण काल गुरुवारी दिनेश माळवेकर यांच्या फुलबाग गल्ली येथील घरामध्ये पैसे लावून अंदर -बाहर जुगार खेळत असल्याची खात्रीला एक माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्या जवळील रोख 9,600 रुपये आणि जुगार खेळण्यासाठी वापरलेले 52 पत्ते व अन्य साहित्य जप्त केले. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 5 गांजाबाज पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव शहरातील दोन वेगवेगळ्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी ‘गांजा’ या अंमली पदार्थाच्या नशेमध्ये अनैसर्गिक विचित्र वर्तन करणाऱ्या एकूण 5 जणांना पोलिसांनी काल गुरुवारी अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे जिनेन्द्र रत्नप्पा बिल्ले (वय 33, रा. लक्ष्मीनगर अनगोळ बेळगाव), प्रशांत रमेश काकतकर (वय 21, रा. बाबली गल्ली अनगोळ बेळगाव), किरण विजय शदबीदरे (वय 26, रा. रामलिंगवाडी, गोवावेस शहापूर बेळगाव) कुमार उमेश चरंतीमठ (वय 26, रा. अन्नपूर्णावाडी बेळगाव) आणि विजयकुमार शेखर सुतगट्टी (वय 27, रा. बसव कॉलनी चौथा क्रॉस बेळगाव) अशी आहेत. यापैकी जिनेंद्र, प्रशांत व किरण हे पहिले तीन आरोपी काल शहापूर येथील प्रियांका हॉटेल जवळ सार्वजनिक ठिकाणी नशेमध्ये विचित्र वर्तन करत होते. तेंव्हा शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ माजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करवली असता, त्यांनी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपीं विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचप्रमाणे कुमार व विजयकुमार हे उर्वरित दोन आरोपी शहरातील रॉयल पब्लिक स्कूल जवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाच्या नशेत आढळून आल्यामुळे एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. जे. पार्थनहळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून वरील दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सुरू आहे.





