बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील नानावाडी क्रॉसजवळ गांजाच्या नशेत विचित्र वर्तन करणाऱ्या दोघा युवकांना टिळकवाडी पोलिसांनी काल बुधवारी अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या युवकांची नावे प्रकाश संजय करंजे (वय 27, रा. जैन गल्ली, हलगा बेळगाव) आणि प्रीतम प्रवीण कुबड्डी (वय 26, मराठा कॉलनी, टिळकवाडी बेळगाव) अशी आहेत. हे दोघेजण नानावडी क्रॉस जवळ सार्वजनिक ठिकाणी अनैसर्गिक वर्तन करत होते.
सदर प्रकार निदर्शनास येताच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व सहकाऱ्यांनी संजय व प्रवीण यांना ताब्यात घेतले असता ते कोणत्यातरी नशेत असल्याचे आढळून आले.
त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता दोघांनीही गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. परिणामी त्या दोघांविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.





