belgaum

मोहनगा देवीची यात्रा या दिवशी होणार

0
1016
Mohanaga
 belgaum

बेळगाव लाईव्ह : दरवर्षीप्रमाणे मौजे मोदगे (मोहनगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथे येत्या सोमवार दि. 2 ते बुधवार दि. 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत श्री भावेश्वरी देवीचा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मौजे मोदगे (मोहनगे) येथील श्री भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी मोदगे आणि श्री भावकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी मोदगे (मुंबई) यांच्यातर्फे माघ पौर्णिमेनंतर वरील प्रमाणे सोमवार दि. 2 फेब्रुवारी 2026 पासून श्री भावेश्वरी देवीची यात्रा आयोजित केली जात आहे.

यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत शस्त्रइंगळ्या कार्यक्रम होईल. त्यानंतर मंगळवारी भरयात्रा होणार असून बुधवारी 4 फेब्रुवारी रोजी पालखी सोहळ्याने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकांनी यात्रेला उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी मोदगे यांनी केले आहे.

 belgaum

त्याचप्रमाणे कोंबडी व बकरी बाजाराची जागा मोदगे -सलामवाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गायरानमध्ये निश्चित करण्यात आली असून भाविकांनी व व्यापारी बांधवांनी याची नोंद घ्यावी. याखेरीज घटप्रभा नदीला पाणी खूप असल्यामुळे भाविकांनी कृपया मोदगे बंधाऱ्यावरून वाहतूक करावी, अशी सूचना यात्रा कमिटीकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.