बेळगाव लाईव्ह :बेळगावचा होतकरू कराटेपटू कृष्णा देवगाडी नुकत्याच पार पडलेल्या 6 व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत ‘ओपन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला आहे.
बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्यावतीने आयोजित उपरोक्त राष्ट्रीय स्पर्धा गेल्या दि. 20 व दि. 21 डिसेंबर 2025 रोजी के.पी.टी.सी.एल. समुदाय भवन, शिवबसवनगर, बेळगाव येथे यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आदी विविध राज्यांतील 1200 हून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता.
त्यामध्ये बेळगावच्या कृष्णा देवगाडी याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘ओपन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाचा किताब पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला 25,000 हजार रुपये रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कृष्णा देवगाडी याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे प्रशिक्षण लाभत असून बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर आणि सचिव जितेंद्र काकतीकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल यशाबद्दल कृष्णा देवगाडी याने कराटे क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.




