अमेरिकेतून कमर्शियल पायलट लायसन्स; श्रेया भातकांडेचा गौरव

0
929
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील न्यू गुड्स शेड रोड परिसरातील रहिवासी श्रेया नितीन भातकांडे हिने अमेरिकेतून कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) प्राप्त करून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सकल मराठा समाज आणि किरण जाधव फाउंडेशनच्या वतीने तिचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

श्रेयाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेळगावच्या सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये झाले असून आरएलएस सायन्स कॉलेजमधून तिने पीयुसी (विज्ञान) पूर्ण केले. वैमानिक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तिने पुणे येथील किटी हॉक अकॅडमीमध्ये डीजीसीए ग्राउंड क्लासेस पूर्ण केले.

त्यानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयाची (DGCA) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत दिल्ली येथून आरटीआर (रेडिओ टेलिफोनी रिस्ट्रिक्टेड) परवाना मिळवला.

 belgaum

पुढील उड्डाण प्रशिक्षणासाठी श्रेया अमेरिकेला रवाना झाली. फ्लोरिडा येथील एनएस एव्हिएशन इंक., फोर्ट लॉडरडेल येथे अवघ्या एका वर्षाच्या आत तिने कठोर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण करत कमर्शियल पायलट लायसन्स प्राप्त केले. बेळगाव–पुणे–दिल्ली–अमेरिका असा प्रवास करत मिळवलेले हे यश अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या सत्कार प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, किरण जाधव फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.