बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी, बेळगाव येथील डिव्हाइन प्रोव्हिडन्स स्कूलची विद्यार्थिनी टेबल टेनिसपटू तनिष्का हिने नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस चॅम्पियनशिप या स्पर्धेत 15 वर्षांखालील गटात सुवर्ण पदक आणि 17 वर्षांखालील गटात कांस्य पदक जिंकले.
झारखंडमधील रांची येथे आयोजित उपरोक्त स्पर्धेत तनिष्का हिने नोंदवलेली ही उत्कृष्ट कामगिरी केवळ तिच्या समर्पणाचीच नव्हे, तर तिच्या सभोवतालच्या भक्कम पाठिंब्याचीही साक्ष आहे.
तिचे प्रशिक्षक व माजी राष्ट्रीय टे. टे. खेळाडू संगम बैलूर यांनी तिची कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
तसूच डिव्हाइन प्रोव्हिडन्स स्कूलने तिला सातत्याने प्रोत्साहन देऊन तिच्या क्रीडा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक लवचिकता प्रदान केली आहे. रांची येथील राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत संध्या पाटील यांनी तनिष्का हिच्या तंदुरुस्ती प्रशिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली,
तर डॉ. बसवराज मोतीमठ व त्यांच्या पथकाने फिजिओथेरपीच्या सहाय्याने ती सर्वोत्तम शारीरिक स्थितीत राहील याची काळजी घेतली. उपरोक्त यशाबद्दल तनिष्का हिचे शाळेमध्ये, तसेच बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात अभिनंदन होत आहे.


