बेळगाव लाईव्ह :कर्नाटक आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा असलेल्या चोर्ला -बेळगाव -गोवा रस्त्यावर पुनर्बांधणी अर्थात नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) सुरू केले आहे.
मलप्रभा नदीवरील अर्धवट बांधलेल्या कुसमळी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पुलाजवळ वाहतूक वळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काम सुरू असताना वाहतूक खंडित होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
चोर्ला मार्गे बेळगाव-गोवा या ठीकठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी दिली.
कार्यकारी अभियंता राजेंद्र यांनी पुलाचे काम आणि रस्त्यांची दुरुस्ती दोन्ही जलद करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत, असे स्पष्ट केले. दरम्यान, चोर्ला -बेळगाव -गोवा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यामुळे सातत्याने या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.




