बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मादक पदार्थ (गांजा) सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई 9 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली असून, सर्व आरोपींवर NDPS कायदा कलम 27(b) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात जावीद इलियास बेन्डिगेरी (29), रा. कुंभार गल्ली, अनगोळ, हा शिवशक्ती नगर परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांना दिसला. चौकशीत त्याने मादक पदार्थ सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा क्र. 111/2025 नोंदवण्यात आला.दुसऱ्या प्रकरणात मोहम्मद अझाज शेख (24), रा. आजादनगर, हा अनगोळ मराठी शाळेजवळ संशयास्पदरीत्या वागताना आढळला. तपासात त्याने गांजा सेवन केले असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुन्हा क्र. 112/2025 नोंदवण्यात आला.
तिसऱ्या प्रकरणात मोहम्मद गुलबर सादिक शरीफ (32), रा. मशीद गल्ली, धामणे, हा बाबळे गल्ली परिसरात संशयास्पदरीत्या आढळला. चौकशीत मादक पदार्थ सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा क्र. 113/2025 नोंदवण्यात आला.तीन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक परशुराम एस. पूजारी (टिळकवाडी पोलीस ठाणे) व त्यांच्या पथकाने केली असून, त्यांच्या कार्याचे पोलीस आयुक्त, बेळगाव शहर आणि उपायुक्त (DCP) यांनी कौतुक केले आहे.




