बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी, बेळगाव येथील आरपीडी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सतर्फे आरपीडी कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने रविवार दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कॉलेजच्या सभागृहात ‘आरपीडियन्स डे’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यास आरपीडी कॉलेज अर्थात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन सलीम बेग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध बहुभाषिक लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी प्रो. के. ई. राधाकृष्ण,
सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप सिंह थोरात आणि पदवी पूर्व शिक्षण उपसंचालक महादेव कांबळे अगर राहणार आहेत. सदर मेळाव्यामध्ये विद्यमान तसेच माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून विविध क्षेत्रात कार्यरत असणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
हा कार्यक्रम भव्यप्रमाणात यशस्वी करण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी विद्यार्थ्यांना केले आहे. अधिक माहितीसाठी माजी विद्यार्थ्यांनी 9449507691, 9241523418, 9769811151 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





