बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्यातील मुतनाळ येथील केदार पीठ शाखेचे श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांचे बेळगाव आतील एका खाजगी रुग्णालयात आजारपणामुळे देहावसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांना बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि उपचाराचा फायदा न होता काल शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले.
अतिशय साध्या व्यक्तिमत्त्वाच्या श्री शिवानंद स्वामीजी यांची अलीकडेच अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. ते सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे व्यक्ती होते.
त्यांच्या निधनामुळे संपूर्ण समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशी अशा शब्दात बेळगाव तालुक्यातील अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांच्या निधनामुळे मुतनाळ गावासह त्यांच्या भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.



