बेळगाव लाईव्ह :धारवाड जिल्हा शरीर सौष्ठव संघटना, कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव व क्रीडा संघटना आणि पंचमुखी हनुमान कमिटी, हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘मिस्टर कर्नाटक बजरंगी -2025’ किताब दावणगेरीच्या राहुल मेहरवाडे याने हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे बेळगावचा रोनक गवस उपविजेतेपदाचा, तर उमेश गंगणे ‘बेस्ट पोझर’ किताबाचा मानकरी ठरला.
हुबळी येथील बजरंगी ग्राउंड या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या सदर राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 110 स्पर्धकांनी भाग घेतला हता. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुनील रेवणकर, बलराम दोडमणी, मल्लय्या हिरेमठ, विनोद पाटील, डॉ. अभिषेक पाटील, सीपीआय जयवंत गवळी, शरीफ मुल्ला आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी पंच म्हणून राजेश लोहार, अनिल अंबरोळे, शरीफ मुल्ला, रमेश शेट्टी, एस. एस. तावडे व इंद्रीस यांनी काम पाहिले. स्टेज मार्शलची भूमिका जावेद नायकर, उमेश रणदिवे, भारत बाळेकुंद्री, राजू पाटील, श्रीराम व मोहम्मद यांनी पार पाडली. पुरुषांसाठी विविध 7 वजनी गटांमध्ये घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते) खालील प्रमाणे आहे.
55 किलो वजनी गट : सलमान खान (शिमोगा), सुमंत कुंभार (धारवाड), गौस पाक (धारवाड), खाजा एम. एस. (धारवाड), पांडुरंग गुरव (बेळगाव). 60 किलो गट : साजिद बशेर (हरिहर), ज्योतिबा पाटील (बेळगाव), प्रभू चौगुले (बेळगाव), ओमकार गवस (बेळगाव), तुषार गावडे (बेळगाव). 65 किलो गट : रोनक गवस (बेळगाव), नागेश सी. (बेळगाव), स्टेफन दास (धारवाड), चेतन वाली (धारवाड), तेजस जाधव (बेळगाव).
70 किलो गट : अली नदाफ (बागलकोट), बसप्पा कोणकेरी (बेळगाव), मलिक रेहान काझी (धारवाड), युवराज राक्षे (बेळगाव), रियाज खान (बेळगाव). 75 किलो गट : राहुल मेहेरवाडे (दावणगेरी), गणेश बंगेरा (मंगळूर), आकाश डी. (दावणगेरी), संतोष कुमार (धारवाड), किरण आर. (दावणगेरी). 80 किलो गट : चेतन ताशिलदार (बेळगाव), शिवाप्पा एन. (बागलकोट), मारुती एस. (हुबळी), मुस्ताक अलगार (विजापूर),
मनीष एस. (बेळगाव). 80 किलो वरील वजनी गट : अनिल बी. (गदग), अब्बास अली संदलवाले (धारवाड), प्रवीण कणबरकर (बेळगाव), श्रीमेश खन्नुकर (बेळगाव), दिग्विजय पाटील (बेळगाव). टायटल विनर विजेता : राहुल मेहेरवाडे (दावणगेरी). उपविजेता : रोहन गवस (बेळगाव). बेस्ट पोझर : उमेश गंगणे (बेळगाव).



