बेळगाव लाईव्ह : भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान होणारा ‘मित्र शक्ती 2025’ हा संयुक्त लष्करी सराव 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत बेळगावातील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे होणार आहे. याबाबतची माहिती भारतीय लष्कराच्या ADGPI यांनी जाहीर केली आहे.
या सरावाचा मुख्य उद्देश शहरी आणि अर्ध-शहरी परिसरात संयुक्त सैन्य मोहिम राबविताना समन्वय आणि कार्यक्षमता वाढवणे असा आहे. या माध्यमातून दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य मजबूत होणार असून, प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीचा परस्पर सहयोग अधिक दृढ होणार आहे, असे लष्कराने म्हटले आहे.
‘मित्र शक्ती’ हा वार्षिक उपक्रम असून भारत आणि श्रीलंका आलटून पालटून त्याचे आयोजन करतात. याची 10 वी आवृत्ती गतवर्षी मदुरू ओया, श्रीलंका येथे झाली होती.
https://x.com/DDIndialive/status/1987762845472481620?t=bXhSG8UolDZL-rA75JoWTQ&s=08




