राज्य सरकारने पालिका आरोग्य अधिकारी पद रद्द केल्यामुळे बेळगाव महानगरपालिकेतील डॉ. संजीव नांद्रे यांचे पद रद्द झाले असून ते आता बेंगलोर येथील आरोग्य विभागात रुजू झाले आहेत.
महापालिका आरोग्य अधिकारी असताना जन्म-मृत्यू नोंदणी, प्रमाणपत्र जारी करणे आणि व्यापार परवाने देणारे डॉ. संजीव नांद्रे हे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे कामही पहात होते.
या सर्व जबाबदाऱ्या आता दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेले पर्यावरण अभियंता अशोक कुमार सज्जन यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत.
एकंदर शहरातील रुग्णालये बंद आणि आरोग्य अधिकारी पद निष्क्रिय झाल्यामुळे आता बेळगाव महानगरपालिका आरोग्य अधिकाऱ्याशिवाय काम करणार आहे.


