बेळगाव लाईव्ह :गणेशपुर मुख्य रस्त्याशेजारील आड रस्त्यावर अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या 5 जणांना कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून 7,200 रुपयाची रक्कम जप्त केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अमित गुलाब बेपारी (वय 31, काकर स्ट्रेट कॅम्प बेळगाव), धरम बिक्कू लांबे (वय 38, ज्योतीनगर, गणेशपूर बेळगाव), प्रकाश संभाजी पाटील (वय 42, सरस्वतीनगर बेळगाव), राजू अर्जुन देसुरकर (वय 34, समर्थनगर बेळगाव) आणि अरिकराजू सॅबॅस्टीन फ्रान्सिस (वय 33, लक्ष्मीनगर, हिंडलगा बेळगाव) अशी आहेत.
याबाबतची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एम. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून उपरोक्त पाच आरोपींना अटक केली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


