बेळगाव लाईव्ह : सुगीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकरी वर्ग शेतात कापणीच्या कामात व्यस्त आहे. अशातच बेळगाव तालुक्यातील हलगा येथे मधमाशांच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे.
पिराजी हनमंताचे असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, काल दुपारी सुमारास तीन ते चारच्या दरम्यान ते आपल्या शेतात भात कापणीचे काम करत होते. यावेळी अचानक मधमाशांच्या मोठ्या थव्याने त्यांच्यावर हल्ला चढवला त्यात ते जखमी झाले.
🐝 असा वाचला त्या शेतकऱ्याचा जीव
मधमाशांनी केलेल्या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ठिकाणी आग लावून धूर निर्माण केला, त्यामुळे मधमाशा पांगल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आली.त्यानंतर जखमी शेतकऱ्याला स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.दरम्यान, भात कापणीच्या काळात शेतकऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे, कारण या दिवसांत झाडाझुडपांमध्ये मधमाशांच्या पोळ्यांमुळे अशा प्रकारचे हल्ले वारंवार घडत असतात.
हॅशटॅग्स:




