बेळगाव लाईव्ह : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनोदी नाटक **‘सिरियल किलर’**ला बेळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिरगे सभागृहात पार पडलेल्या या मराठी नाटकासाठी मराठी भाषिक प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती.
विनोदी कलाकार भाऊ कदम यांच्या दमदार अभिनयाने सभागृहातील प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. त्यांच्या प्रत्येक विनोदी प्रसंगाला प्रेक्षकांकडून धमाल प्रतिसाद मिळत होता. कार्यक्रमानंतर बेळगावकरांनी भाऊ कदम यांच्या अभिनयाची प्रशंसा करत भरभरून दाद दिली.
या नाटकासाठी अभिनेत्री गायत्री दातार, गीता कदम तसेच कलाकार तेजस पिंगुळकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली. सर्व कलाकारांनी प्रभावी सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली.
हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या चॅरिटी शोच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमातून जमा होणारा निधी विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमापूर्वी सुरुवातीला अभिनेते भाऊ कदम यांनी बेळगावकरांचे विशेष आभार मानले आणि मिळालेल्या प्रेमाने ते भारावून गेल्याचे सांगितले. यावेळी चॅरिटी शो साठी मदत केलेल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.


