बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात नेहमी ‘तलख’ वार करणारे आणि सभागृहात अचूक लक्ष्य साधणारे सार्वजनिक बांधकाम आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे स्ट्रायकर आला की खेळाचं चित्रच बदलतं.
बेळगाव यंग कमिटीतर्फे आयोजित अब्दुल कलाम ऑल इंडिया कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ही झलक सर्वांनी पाहिली.
दीपप्रज्वलन झाल्यानंतर कॅरम बोर्ड मांडण्यात आला.
सतीश जारकीहोळी यांनी स्ट्रायकर उचलला आणि पहिल्याच शॉटमध्ये ‘क्लीन हिट’ करत स्पर्धेला दमदार सुरुवात केली.
प्रेक्षकांतून टाळ्यांचा कडकडाट झाला.
या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, केरळ, छत्तीसगड इत्यादी सात राज्यांतील अनुभवी कॅरमपटू सहभाग घेत आहेत.
स्पर्धेत तीन विभागांमध्ये रू. 2 लाख 85 हजारांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

उद्घाटन प्रसंगी आमदार असिफ (राजू) सेठ, विरोधी गटनेते सोहेल संगोळ्ळी, नगरसेवक अझीम पटवेगार, बाबाजान मतवाले, शाहिद खान पठाण, विनय नावलगट्टी, बसवराज शेंगावी, इरफान हुदली, अब्बास नदाफ, मुदस्सर बेपारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


