belgaum

खानापूर नदीत बुडाला युवक

0
37
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सैन्य भरतीसाठी उंची कमी असल्याने दैनंदिन सराव करण्यासाठी मलप्रभा नदीत पोहायला गेलेला युवक बुडाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली आहे. या घटनेत बुडालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव प्रथमेश रवींद्र पाटील (वय 18) असे आहे.

याबाबत मिळालेली माहिती की, प्रथमेश रवींद्र पाटील हा बारावीपर्यंत खानापूर वागळे विद्यालयात शिकून मिलिटरी भरतीसाठी प्रयत्न करत होता. त्याची उंची कमी असल्याने तो दैनंदिन धावणे व्यायाम करणे व पोहणे सराव करत होता. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या घरात मी नदीकडे पोहायला जातो असे आपल्या लहान भाऊला सांगून तो गेला होता.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो नदीत पोहत असल्याचेही गावातील एका व यडोगातील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहिले होते. पण कोणीतरी पोहत असावा असा अंदाज व्यक्त करून ते पुढे सरसावले. मात्र रात्री साडेनऊ पर्यंत सदर युवक घरी परतला नसल्याने घरच्यांनी विचारपूस केली व संशयाने नदीकडे जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूलाआपली इलेक्ट्रिक दुचाकी व कपडे काढलेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे तो पोहोचताना नदीत बुडाल्याचा संशय बळकावला. व तातडीने त्यांनी खानापूर पोलीस स्थानकाला पाचारण करून या घटनेची माहिती दिली.

 belgaum

शनिवारी सकाळी गावातील नागरिक व पोलीस घटनास्थळी हजर झाले. रेस्क्यू टीमला ही पाचारण करण्यात आलून युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे त्यांचे वडील रवींद्र नागोजी पाटील हे देखील निवृत्त सैनिक आहेत. त्याच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल लोकोळी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दोन महिन्यातील दुसरी घटना !

चापगाव यडोगा रस्त्यावरील यडोगा डॅम नजीक गणेश चतुर्थीला विसर्जनाच्या वेळी यडोगा येथील एक युवक बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली होती. सदर युवक डॅम वरून बुडाला होता. मात्र हा युवक डॅम पासून काही अंतरावर लोकोळीच्या बाजूने शेतवडीतून उतरणाऱ्या रस्त्यावरून खाली उतरून पोहोचताना बुडाल्याचे कळते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.