बेळगाव लाईव्ह : आगामी 8 डिसेंबर पासून बेळगाव येथील सुवर्ण सौध मध्ये कर्नाटक राज्य सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे त्या अधिवेशनाच्या विरोधात पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीने विरोध करण्याचा निर्णय शहर समितीच्या बैठकीत घेतला आहे.
वादग्रस्त सीमाभागात कर्नाटक सरकारने पुन्हा हिवाळी अधिवेशन घाट घातला आहे त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एकदा विरोध करणार आहे.रामलिंगखिंड गल्लीतील रंगुबाई भोसले पॅलेसमध्ये शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक झाली. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असतानाही कर्नाटकाकडून दरवर्षी हिवाळी अधिवेशन बेळगावात भरविले जाते. या बेकायदा अधिवेशनाला विरोध करण्यासाठी यावेळीही महामेळावा घेण्यात येणार आहे. आतापर्यंत सोळावेळा महामेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी २०१७ पर्यंत आम्हाला अटींवर परवानगी देण्यात आली होती. पण,
त्यानंतर परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही आम्ही वेगवेगळ्या मागनि कर्नाटकाच्या अधिवेशनाला विरोध केला आहे. यावेळीही विरोध करणे आवश्यक असल्याने महामेळावा घेण्यात येईल, असे अध्यक्ष मरगाळे यांनी स्पष्ट केले.सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून वारंवार खोटे गुन्हे दाखल करण्यात
येत आहेत. याबाबत महाराष्ट्राचे नेते जयंत पाटील यांनी या प्रश्नाबाबत केंद्र सरकारकडे दाद मागण्यासाठी लेखी माहिती जमा करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पोलिसांकडून दाखल करण्यात येत असलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती जमा करण्यात येत असून केंद्र सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षाला माहिती देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यकत्यांवर दबाव घालण्यात येत आहे. असे प्रकार याआधीही झाले आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महामेळाव्याद्वारे अन्यायाचा विरोध करू, असे नेताजी जाधव यांनी सांगितले.



