बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील गणेबैल-काटगाळी रस्त्यावर, जंगल भाग असलेल्या ठिकाणी शेतवडी नजीक एका शेतकऱ्याच्या बैलावर गविरेड्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.
गवि रेड्याच्या हल्ल्यात बैलाचा जबडा तुटला आहे त्यामुळे पशुसंघोपन खात्याच्या वैद्याधिकाऱ्यांनी उपचार करण्यास असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे शासनाने सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी नेगील योगी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर सुळेभावी कर यांनी केली आहे.
गणेबैल येथील शेतकरी देवाप्पा राघोबा गुरव या शेतकऱ्याच्या मालकीचा बैल असून, गवी रेड्याच्या हल्ल्यात बैलाचा जबडा फाटून तुटला आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व पशु संगोपन खात्याच्या वैद्याधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पशु संगोपन खात्याच्या वैद्याधिकाऱ्यांनी सदर बैलावर उपचार करण्यास असमर्थता दाखविली असून बैलावर उपचार होणार नाहीत असे सांगितले आहे.
बैलाचा जबडा जरी फाटला असला तरी बैल शरीराला इतरत्र कोठेही गंभीर जखम झाली नाही. बैल तंदुरुस्त आहे. परंतु वैद्याधिकाऱ्यांनी उपचार करण्यास असमर्थता दाखविल्यामुळे, चारा पाण्याअभावी बैलाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
पशु संगोपन खात्याच्या वैद्याधिकाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टीने सदर गंभीर जखमी बैलावर प्रथमोपचार सुरू करणे गरजेचे होते. परंतु टेक्नॉलॉजीच्या युगात वैद्याधिकाऱ्यांनी असमर्थता दाखविली आहे.
नेगील योगी रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर सुळेभाविकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व शासनाने सदर बैल मालकास नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे. यावेळी नारायण कोलेकर, मारूती भुताप्पा गुरव, रमेश कवठणकर, ज्ञानेश्वर गेजपतकर, सदिप मा गुरव, मीनाजी दे गुरव, पुडलीक ग गुरव हे शेतकरी उपस्थित होते.



