बेळगाव लाईव्ह: चालू असलेल्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील मुच्छंडी गावाजवळ घडली आहे.
या अपघातात अथणी तालुक्यातील चीकट्टी गावचे अभिषेक आरवेकरी (वय २२) आणि सलमान मुक्केरी (वय १८) हे दोघे युवक जागीच मृत्युमुखी पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर जुग्गाड स्पर्धेसाठी जात असताना हा अपघात झाला. ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेने चीकट्टी गावात शोककळा पसरली आहे.


