शिरोडा  समुद्रात ८ पर्यटक बुडाले तिघांचा मृत्यू इतरांचा शोध सुरू

0
2
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथील वेळागर समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेलेल्या कर्नाटक राज्यातील आठ पर्यटकांना जलसमाधी मिळाल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण समुद्रात बुडाले. हे सर्व पर्यटक कर्नाटक राज्यातील लोंढा आणि अळणावर येथील रहिवासी होते आणि ते फिरण्यासाठी सिंधुदुर्ग येथे आले होते. या दुर्घटनेत आठही जण बुडाले असले तरी, त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे, तर शोधमोहिमेत तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित चार जणांचा शोध सध्या सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील खानापूर, लोंढा आणि अळणावर येथील आठ जण वेळागर समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. या दुर्घटनेतील आठ जणांपैकी एका पर्यटकाला वाचवण्यात यश आले आहे. तर, तीन जणांचे मृतदेह शोध पथकाला सापडले आहेत. अन्य चार जणांचा अद्यापही शोध सुरू आहे.

वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५  दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे.  सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.  उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू आहे.

 belgaum


*समुद्रातून बाहेर काढलेल्या पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे* १. इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष 17 रा. लोंढा, बेळगाव  सदर युवतीला वाचवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.२. फरहान इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत)३.  इबाद इरफान कित्तूर , वय १३ रा. लोंढा,  बेळगाव (मयत),४. नमीरा आफताब अख्तर वय  16, रा अळनावर,  बेळगाव (मयत)

*बेपत्ता पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे*
१.  इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, वय 36 रा. लोंढा, बेळगाव
२.  इक्वान इमरान कित्तूर, वय 15 रा. लोंढा, बेळगाव
३.फरहान मोहम्मद मणियार, वय 20, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
४ जाकीर निसार मणियार वय 13, रा. कुडाळ जिल्हा  सिंधुदुर्ग.

घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.