शहापूर सह अन्य पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0
16
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :राज्यातील पोलिस उपाधीक्षक व निरीक्षकांच्या बदलीचा आदेश जारी झाला आहे. त्यात बेळगाव शहरासह जिल्ह्यातील काही निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शहापूरचे निरीक्षक एस. एस. सीमानी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा यादीत समावेश आहे.

राज्यातील २७ उपाधीक्षक व १३१ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश सोमवारी (दि. ६) पोलिस प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सौमेंदू मुखर्जी यांनी बजावला.

त्यात शहर व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शहापूरचे निरीक्षक सीमानी यांची लोकायुक्त विभागाकडे बदली झाली असून त्यांच्या जागी दावणगेरे हुन संतोषकुमार डी. यांची नियुक्ती झाली आहे. सध्या मारीहाळचे निरीक्षकपद प्रभारी म्हणून मंजुनाथ नायक यांच्याकडे आहे. परंतु, येथे पूर्वी कार्यरत असलेले गुरुराज कल्याणशेट्टी यांचीही लोकायुक्त विभागात बदली झाली आहे.
त्यामुळे, मारीहाळच्या निरीक्षकपदाची सूत्रे आता आय. आर. पट्टणशेट्टी स्वीकारणार आहेत.

 belgaum

नंदगडचे निरीक्षक एस. एस. पाटील यांची लोकायुक्त विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी रवीकुमार धर्मट्टी यांची नियुक्ती झाली आहे. खानापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रभाकर धर्मट्टी यांची कारवारला तर सौंदत्तीचे निरीक्षक धर्माकर धर्मट्टी यांची केएसआरपी बेळगाव येथे बदली झाली आहे.

हुक्केरीचे निरीक्षक महांतेश बसापुरे आता संकेश्वरचा कार्यभार स्वीकारणार आहेत. संकेश्वरचे शिवशरण अवजी यांची लोकायुक्तकडे तर कारवार शहरचे रमेश हुगार यांची धारवाड शहर निरीक्षकपदी बदली झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.