शंभू पैलवानाने पटकावला ‘युवा भारत केसरी २०२५ किताब

0
4
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील रामनाथ मंगल कार्यालयात ‘मिशन ऑलिम्पिक कुस्ती संघटना कर्नाटक’ यांच्यावतीने आयोजित ‘युवा भारत केसरी २०२५’ या मानाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या शंभू पैलवानाने बाजी मारली. अंतिम लढतीत त्याने उत्तर प्रदेशच्या पैलवान यशपालवर मात करत हा प्रतिष्ठित किताब पटकावला.

तर, महिलांच्या युवा भारत केसरी किताबासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत मंगळूरच्या पैलवान अदितीने वाशिमच्या दिव्या शर्माला हरवत यश संपादन केले.

शनिवार २५ आणि रविवार २६ ऑक्टोबर रोजी रामनाथ मंगल कार्यालयात ‘मिशन ऑलिम्पिक’ संघटनेच्या मदतीने या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील आठ राज्यांतून आलेल्या ३०० हून अधिक पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

 belgaum

जनरल चॅम्पियनशिपचा निकाल: स्पर्धेच्या जनरल चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक, कर्नाटकने द्वितीय क्रमांक तर हरयाणाने तृतीय क्रमांक पटकावला. महिला जनरल चॅम्पियनशिप गटात कर्नाटकने प्रथम क्रमांक, महाराष्ट्राने द्वितीय तर केरळ राज्याने तृतीय क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले.

रविवारी सायंकाळी खासदार जगदीश शेट्टर आणि भाजप नेते किरण जाधव यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी डॉ. सतीश चौलगार, अमोल साठे, बाळाराम पाटील, विश्वनाथ पाटील, मल्लेश चौगुले, चेतनंगडी, भरत पाटील, महेश लोहार आदी पाहुणे उपस्थित होते.

कमिटीच्या वतीने अतुल शिरोळे, गंगाधर, महेश गुंजकर, चेतन देसाई, भावेश बिर्जे, दुन्देश नाईक, नागेश सुतार, अमर निलाजकर, शाहीन डी आणि विद्या पाटील यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे सूत्रसंचालन पिंटू पाखरे यांनी केले, तर संजय मुरारी आणि नागेश सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.