दिवाळी निमित्त बेळगाव लाईव्हची
मराठा सप्ताह… विशेष लेखमाला.. जागा हो मराठा.. वाचण्यासाठी एकाच ठिकाणी उपलब्ध
जग वेगाने बदलत आहे. एकेकाळी १०० टक्के शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाज आता आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रांकडे वळवत आहे. विविध क्षेत्रांत आपले पाय रोवू पाहत असताना, नव्या क्षेत्रात प्रवेश करताना अनेक समस्या उभ्या राहतात. दुर्दैवाने, बेळगावच्या मराठा समाजालाही अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे आणि समाजाची प्रगती काही प्रमाणात खुंटल्याचे दिसत आहे. बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे होणारी वाटचाल, याला नेमके कोण जबाबदार आहे? समाजासमोरच्या नेमक्या समस्या काय आहेत? या समाजाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? या प्रश्नांचा वेध घेणे आज अत्यंत आवश्यक आहे.
‘जागा हो मराठा’ या विशेष लेखमालेतून आम्ही बेळगावच्या मराठा समाजाला भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांवर प्रकाश टाकून, प्रगतीपथावर जाण्यासाठीचे ठोस उपाय आणि कृतीची दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खास दिवाळीनिमित्त यंदापासून सुरू केलेली ही मराठा समाजावर आधारित विशेष लेखमालिकेला समाजातील विविध स्तरातून नेतृत्वातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. बेळगाव लाईव्हच्या या मराठा सप्ताहचे विशेष लेखमालेचे कौतुक झाले आहे ते आमच्या संपादकीय टीमचा उत्साह वाढवणारे आणि प्रोत्साहन देणारे आहे. मराठा हे तेज आहे. हे कालौघात लोप पाऊ नये यासाठी मराठ्यांनी सजग होण्याची गरज आहे, म्हणून बेळगाव लाईव्ह तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. ज्या समाजात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला,त्या समाजाने छत्रपतींच्या कार्याचा आदर्श घेत समाजाला पुढे नेण्याची गरज आहे या जाणीवेतून समाज जागा होईल हीच अपेक्षा.
एका आठवड्यातील सात दिवसाचे सातही विशेष लेख आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत खालील त्याच्या लिंक दिल्या आहेत तुम्ही वाचल्या नसल्यास एकदा जरूर वाचा.
1.
बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे वाटचाल: याला कोण जबाबदार?
वाचा बेळगाव लाईव्ह विशेष
https://belgaumlive.com/2025/10/belgaum-maratha-samaj-awarness/
2.
राजकीय गुलामगिरी आणि भविष्याची हेळसांड
3.
बेळगावच्या मराठा समाजासमोरील आर्थिक अरिष्ट, चुकलेले आर्थिक नियोजन वाचा
बेळगाव लाईव्ह विशेष
https://belgaumlive.com/2025/10/devlopment-analysis-belgaum-maratha-samaj/
4.
पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी मराठा समाजाने काय करावे?
कश्या असणार बेरोजगारी आणि आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना वाचा बेळगाव लाईव्ह विशेष
https://belgaumlive.com/2025/10/belgaum-maratha-samaj-devlopment-spl-maratha-week/
5.
मराठा समाजाला वाचवण्यासाठी तरुण पिढीची ‘तडजोड’ आणि ‘स्वयंनिर्भरता’ का गरजेची वाचा बेळगाव लाईव्ह विशेष
https://belgaumlive.com/2025/10/marriages-maratha-samaj-devlopment-maratha-week-special/
6.
बेळगावच्या मराठा समाजाला वाचवण्यासाठी का हवी कृषी-क्रांती आणि उद्योगांची जोड.. वाचा बेळगाव लाईव्ह मराठा सप्ताह स्पेशल मध्ये
https://belgaumlive.com/2025/10/maratha-week-devlopment-maratha-belgaum-agriculture-business/
7.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि जीवनशैलीतील आव्हानांवर विशेष लेखमालिका स्पेशल मराठा सप्ताह मध्ये
जागा हो मराठा!… फक्त बेळगाव लाईव्ह वर
https://belgaumlive.com/2025/10/devlopment-maratha-samaj-belgaum-maratha-week/


