बेळगाव लाईव्ह : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या हद्दीत रात्री झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कार आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्ती गावाबाहेर ही दुर्घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकी व कारचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.
या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास अथणी पोलिस करत आहेत.



