बेळगाव लाईव्ह : नारायण गौडा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर महामूर्ती पोलिसांनी त्यांचा मोबाईल आणि काही जप्त करत त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
कन्नड वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेल्या युवा समिती सीमा भाग चे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता दिवसभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते रात्री त्यांची पोलिस स्थानकातून जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्या दरम्यान पोलिसांनी शेळके यांचा मोबाईल आणि कार ही जप्त केली आहे.
कन्नड रक्षण वेदिकेचे म्होरक्याने दोन दिवसांपूर्वी बेळगाव मराठी भाषिका विरोधात गरळ ओकत काळा दिन पाळल्यास बेळगावची रणभूमी होईल असे वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचा युवा समिती सीमा भाग चे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपल्या खास शैलीतून खरपूस समाचार घेतला होता आणि कानडी संघटनांना खडे बोल सुनावले होते. शेळके यांनी नारायण गौडा यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत माळमारुती पोलिसांनी शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी सकाळी 9:30 शेळके यांना माळ मारुती पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशी सुरू केली यादरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानक परिसरात धुडगूस घातला होता त्यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दुपारच्या सत्रात पोलिसांनी चौकशीसाठी करिता शेळके यांचा मोबाईल आणि कार गाडी जप्त केली. ज्या ठिकाणी गाडीच्या बाजूला थांबून व्हिडिओ करण्यात आलेली गाडी आणि चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला त्यानंतर रात्री उशिरा पोलीस स्थानकात जामीन मिळाला त्यानंतर मुक्तता करण्यात आली वकील महेश बिर्जे यांनी वकील म्हणून काम पाहिले.
लोकशाही मार्गातून न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर धुडगूस घालून दबाव आणणाऱ्या कानडी कार्यकर्त्यांवर प्रशासन निर्णय कोणतीच कारवाई केली नाही यावर दुटप्पी भूमिके बाबत नाराजी व्यक्त होत आहे.




