बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारकडून हाती घेतल्या जाणाऱ्या जातीनिहाय जनगणनेवेळी कोणत्याही निकषाची पर्वा न करता समस्त मराठा समाज बांधवांनी सर्वेक्षणाच्या फाॅर्ममध्ये धर्म-हिंदू , जात-मराठा, पोटजात- कुणबी व मातृभाषा-मराठी अशीच नोंद करावी, असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळ बेळगावचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे
कर्नाटक सरकारकडून राज्यात जात जनगणना केली जाणार आहे. त्यामुळे या गणतीवेळी मराठा समाजाने व्यवस्थितरीत्या माहिती देणे गरजेचे आहे. सर्वेक्षणात ‘कुणबी’ असा उल्लेख केल्यास कोणताही गैरसमज होण्याचे कारण नाही.
कोणत्याही निकषाची पर्वा न करता मराठा समाजाने जातीनिहाय सर्वेक्षणाच्या फाॅर्ममध्ये धर्म-हिंदू , जात-मराठा, पोटजात- कुणबी, व मातृभाषा-मराठी अशीच नोंद करावी. याचा फायदा आपल्या मुलांना भविष्यात नक्की होईल.
तेंव्हा कृपया पान नं. 5 वरील अनुक्रमणिका 8 मध्ये धर्म -हिंदू , अनुक्रमणिका 9 मध्ये जात -मराठा, अनुक्रमणिका 10 मध्ये पोटजात -कुणबी, तसेच
पान नं. 6 वरील अनुक्रमणिका 15 मधील क्रमांक 6 मातृभाषा -मराठी असे भरून द्यावी ही विनंती, असे आवाहन प्रकाश मरगाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



